कधी कधी असं का होतं?
स्पर्श केल्याशिवाय स्पर्श जाणवतो,
प्रत्यक्ष पाहिलं नसतानाही पाहिल्याचा भास होतो,
फक्त ऐकूनच सुवासाने उल्हासित व्हायला होतं,
समोरच्याला काय बोलायचंय ते त्याने सांगितल्याशिवायच कळतं,
कधी कधी असं का होतं?
खाल्याशिवाय पदार्थाची चव जिभेवर रेंगाळते,
पोट रिकामी असतानाही भरलेलं वाटतं,
दमडीही नसताना श्रीमंत आणि अब्जादिश असताना गरीब आहोत असं वाटतं,
नुसतंच बघत असूनसूध्दा आपणच करतोय असं वाटतं,
कधी कधी असं का होतं?
वाचायला येत नसतानाही लिहिलंय त्याचा अर्थ लागतो,
आयुष्यात पहिल्यांदाच लिहिलेलं कौतुकास पात्र ठरतं,
वस्त्र परीधान केल्याशिवाय ते आपल्यावरच शोभतं,
कसलाही मागमूस नसतानाही डोक्यात विचारचक्र सुरु होतं,
कधी कधी असं का होतं?
एकटं बसलेलं असताना खुदकन हसू येतं,
काही सांगायच्या आतच ढसाढसा रडू कोसळतं,
रक्ताचं नातं नसतानाही मन भरून येतं,
दिर्घायुष्य मिळालय असं वाटत असताना अचानक हृदय बंद पडतं,
कधी कधी असं का होतं?