Tuesday, September 28, 2010

म्हणजे काय?

माया,
लळा लागणं,
आनंद,
प्रेम,
म्हणजे काय?
नेमकं, मोजक्या शब्दात सांगणं,
कठीण आहे!


दुःख,
लोभ,
मत्सर,
राग,
म्हणजे काय?
नेमकं, मोजक्या शब्दात सांगणं,
कठीण आहे!


मला काहीतरी करायचंय,
स्वतःसाठी,
आपल्या माणसांसाठी,
देशासाठी,
म्हणजे काय?
नेमकं, मोजक्या शब्दात सांगणं,
कठीण आहे!

मी स्वतःला बदलेन,
समाजाला बदलेन,
देशाला बदलेन,
किंवा जग बदलून टाकीन,
म्हणजे काय?
नेमकं, मोजक्या शब्दात सांगणं,
कठीण आहे!


पण,
नेमकं, मोजक्या शब्दात सांगणं,
कठीण आहे!
म्हणजे काय?

Sunday, September 19, 2010

तरुणांचे मुक्त व्यासपीठ

स्वत:च्या आयुष्यात काहीतरी वेगळं करू इच्छिणाऱ्या आणि इतरांच्याही आयुष्यामध्ये काहीतरी वेगळेपण आणू इच्छिणाऱ्या तरुणांचे मुक्त व्यासपीठ असलेल्या अमरावती येथील प्रयास या संस्थेने आयोजित केलेलं सेवांकुरचं सातवं शिबीर २० ते २२ ऑगस्ट दरम्यान आनंदवन, वरोरा येथे नुकतेच पार पडलं. त्याविषयी.. 
अमरावती, नांदेड, सोलापूर, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, मुंबई, पुणे, नाशिक या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळपास २०० तरुण यात सहभागी झाले होते. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आलेले वक्ते हे आयुष्यात काय करावं या गोंधळातून बाहेर पडलेले, वयाने, वृत्तीने आणि मनाने तरुण असतातच आणि वैशिष्टय़ म्हणजे एखादा अपवाद सोडला तर पूर्ण तीन दिवस सहभागींबरोबर वास्तव्य करतात. शिबिराच्या पहिल्याच सत्रात आयोजक डॉ. अविनाश सावजी म्हणाले की, ''we share emotions than information'', कारण जर एखादी गोष्ट मनाला पटली तरच ते कार्य आपण हसतमुखाने हाती घेऊन पुढे नेतो. २००७ साली झालेल्या सेवांकुरच्या पहिल्या शिबिराला बाबा आमटेंचे आशीर्वाद लाभले होते. त्यावेळेस ते म्हणाले होते की, ‘‘अंकुर म्हणजे तो, जो दगड फोडून आकाशाच्या दिशेने झेप घेतो तो. आयुष्यात कधीही समाजसेवा न करता समाजसुधारणा करा तरच प्रगत समाज निर्माण होऊ शकेल.’’ 
सेवांकुरची खासियत म्हणजे इथे विद्वत्तापूर्ण भाषणं नसून संवादाच्या माध्यमातून सत्र होतात. वक्त्यांच्या मुलाखतींसाठी सहभागींमधीलच काही तरुणांना आमंत्रित केले जाते. म्हणूनच दिवसेंदिवस सहभागींची संख्या वाढत असून, गेल्या तीन वर्षांत पंधराशेहून अधिक तरुण यात सहभागी झाले आहेत. हा तीन दिवसांचा प्रवास आनंददायी व्हावा, आठवणीत राहावा आणि वातावरण उत्साहाने भरून टाकण्यासाठी तसेच नव्या आशा, उमेद व प्रेरणा जागविण्यासाठी प्रत्येक सत्राच्या सुरुवातीला एक गीत म्हटले जाते. त्यामध्ये साने गुरुजी, वसंत बापट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ग. दि. माडगुळकर इ.बरोबरच नव्या कवींच्या मराठी आणि हिंदी गीतांचा समावेश असतो. सकाळी सहा वाजता सुरू होणारा दिवस रात्रीचे दोन वाजले तरी संपत नाही. वेळापत्रकानुसार सत्र होत असली तरी अनेक ज्येष्ठ अनुभवी मित्र प्रत्येक शिबिराला आवर्जून येतात त्यामुळे शक्य होईल तेव्हा त्यांचेही मार्गदर्शन घेण्यासाठी तरुणांची धाव असते. वक्त्यांशी संवाद साधताना अनेक गोष्टी या हृदयाला भिडत असतात, पण प्रत्येक वेळी पाणावलेल्या डोळ्यांनी टाळ्या पिटायच्या स्थितीत आपण नसतो त्यामुळे अशा वेळी काहीही न बोलता त्या भारलेल्या वातावरणात आपला एक हात वर करून दाद देण्याची पद्धतही न्यारीच म्हणावी लागेल. यावेळी शिबिराला वक्ते म्हणून धनंजय वैद्य, डॉ. अविनाश पोळ, दादाजी खोब्रागडे, रेखाताई चोंडेकर, डॉ. भाऊसाहेब उबाळे, आदेश बांदेकर, डॉ. अश्विनी जोजरा, कौस्तुभ आणि पल्लवी आमटे आणि विकास आमटे लाभले होते.
मित्रांमध्ये पर्यावरणग्रस्त म्हणून परिचित व व्यवसायाने आर्किटेक्ट असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील, आजरा तालुक्यातील रायवाडा या खेडय़ात राहून ग्रीन जीवनशैली स्वत: जगणारे धनंजय वैद्य हे शिबिरातील पहिले वक्ते. स्वत:च्या गरजा कमी ठेवून निसर्गगामी पर्यायांच्या शोधात स्वावलंबनाच्या दिशेने प्रयोगशील वाटचाल करणारे वैद्य म्हणाले की, दरवर्षी भारतातल्या कुठल्याही एका आर्किटेक्ट कॉलेजमध्ये कमीतकमी एक हजार डिझाइन्स तयार होतात, पण एकाही कॉलेजमध्ये शेतकऱ्याचं घर डिझाइन करायला दिलं जात नाही. ग्रीन जीवनशैलीबाबत फक्त बाता न करून ती अमलात आणायला हवी तरच आपण निसर्गाशी स्पर्धा करू शकू अन्यथा तो आपलं रौद्र रूप दाखविल्याशिवाय राहणार नाही. इयत्ता तिसरीपर्यंत शिक्षण झालेले, आजही फक्त दीड एकर जमिनीवर शेतीचे वेगवेगळे प्रयोग करणारे नांदेड जि. चंद्रपूर येथील दादाजी रामजी खोब्रागडे हे शिबिरातील दुसऱ्या सत्राचे वक्ते. तांदळाच्या दहा नव्या जातींचा शोध लावणाऱ्या या शेतकऱ्याचा आय. आय. एम.ने त्यांच्या कामाची दखल घेऊन गौरव केला, परंतु एक शेतकरी म्हणून महाराष्ट्र सरकारला त्यांची व्यवस्थित दखल घेता आलेली नाही ही बाब खेदजनक आहे. गरीब शेतकऱ्याला वैज्ञानिक पद्धतीने आपलं संशोधन सिद्ध करता येत नाही, त्यामुळे शेतीचा अभ्यास करणाऱ्या आजच्या तरुणांनी पुढे येऊन ही दरी भरून काढली पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं. संध्याकाळच्या सत्रात बाबा आमटेंचा मोठा मुलगा विकास आमटे यांनी सहभागींशी संवाद साधला. ‘आनंदवन बंद करणं’ हे आमचं ब्रीदवाक्य आहे असं ते सुरुवातीलाच म्हणाले, कारण महारोग हा समाजवादी आहे. समाजाने या सर्वाना आपलं म्हटलं की आमचं काम संपणार. महारोगींची संख्या कोटीच्या घरात असतानाही आजवर महारोग्यांवर उपचार करणारं एकही प्रायव्हेट हॉस्पिटल कुणी काढलेलं नाही, तीस सेकंदाच्या जाहिरातीत महारोग्यांबद्दल बोलण्यासाठी सिनेतारका लाखो रुपये घेतात पण मदत कोणीच करीत नाही. परमेश्वर सर्व नीट करेल हे मला पटत नाही. तो चालत नाही, बोलत नाही, बघत नाही, ऐकत नाही त्यामुळे तोच माझा पहिला पेशंट आहे असं बाबा आमटे  म्हणायचे. त्यामुळे आजच्या तरुण पिढीने याचं गांभीर्य लक्षात घेऊन मदतीस पुढे येण्यास त्यांनी सांगितलं. पहिल्या दिवसाचा शेवट हा गटचर्चेने झाला. आपल्याला आजवर आलेले चांगले-वाईट अनुभव व आपल्याला आयुष्यात काय करावंसं वाटतंय हे शेअरिंग रात्री दोन वाजेपर्यंत चालू होतं. 
दुसरा दिवस पुन्हा पहाटे सहा वाजता सुरू झाला. तासभर वेगवेगळे खेळ खेळल्यानंतर आंघोळ आणि न्याहरीनंतर बरोबर नऊ वाजता पहिलं सत्र सुरू झालं. या सत्राचे वक्ते होते मूळ सातारा जिल्ह्याचे रहिवासी, कॅनडाच्या मानवाधिकार आयोगाचे पहिले हायकमिशनर डॉ. भाऊसाहेब उबाळे. महाराष्ट्रातल्या एका छोटय़ाशा खेडय़ातल्या भाऊसाहेबांनी आज आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावलंय. जगातले सर्व पंतप्रधान हे त्यांचे मित्र आहेत, म्हणूनच ते म्हणाले आयुष्यात मोठी स्वप्नं बघायला शिका. इच्छा आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची आपली तयारी असेल तर काहीच अशक्य नाही. जगातील सर्वात जास्त बुद्धिवंत माणसं ही भारतात आहेत, त्यामुळेच आपल्याला त्यांची किंमत नाही असंही उपहासाने ते म्हणाले. त्यानंतर कोणताही ब्रेक न घेता दुसऱ्या सत्राची सुरुवात झाली कारण दार उघड वहिनी असं म्हणत महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या आदेश बांदेकरांचं आगमन झालेलं होतं. गिरणगावातून सुरू झालेला प्रवास आजवर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कसा अविरत चालू आहे हे पहिल्यांदाच सर्वासमोर येत होतं. आजच्या या कोरडय़ा जगात ओलावा जपणारी माणसं खूप कमी सापडतात ती इथे भेटल्याचं त्यांनी नमूद केलं. सतत हसतमुख राहायचं असेल आणि सन्मानाने पुढे जायचं असेल तर काम  मागण्याची कधी लाज वाटू देऊ नका. ज्या ठिकाणी आपण राहतो, त्या ठिकाणाला आपला अभिमान कसा वाटेल हे ध्यानात ठेवून काम केलं, की चेहऱ्यावरचं हसू कायम राहतं असंही ते म्हणाले. दुपारच्या जेवणानंतरच्या सत्राचे वक्ते  खास जम्मूहून आलेले डॉ. अश्विनी जोजरा. सहयोग इंडिया या संस्थेचे संस्थापक आणि बेताची परिस्थिती असलेल्या एक हजाराहून अधिक मुलींची लग्नं लावून देणारं हे व्यक्तिमत्त्व. आयुष्यात कितीही प्रगती केली तरी त्यांचा गर्व करू नका हे सांगताना ते म्हणाले ‘मुझे फिर से जमिन पर आना है, इस सच्चाई से हवाई जहाज कभी मूंह नहीं फेर सकता.’ समाजाला जागृत करण्याआधी आपण स्वत: जागरूक होणं गरजेचं असल्याचा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. शिबिराच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्राला आनंदवनाच्या कामातल्या तिसऱ्या पिढीचे शिलेदार कौस्तुभ आणि पल्लवी आमटे उपस्थित होते. काळाबरोबर नवी आव्हानं स्वीकारतानाही  ‘भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन राबा’ हा बाबा आमटेंचा मंत्र जपत असल्याचं ते म्हणाले. आनंदवनात उभ्या राहिलेल्या कामाचा सांभाळ आणि विस्तार करण्यासाठी पैशांची गरज आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त गरज आहे ती माणसांची, कारण This is not ''Amte & Sons Priv. Ltd.'' त्यामुळे  अधिकाधिक तरुणांनी पुढे येऊन हे कार्य पुढे नेण्यास हातभार लावावा असं ते म्हणाले. शिबिरातल्या शेवटच्या वक्त्या होत्या विक्रीकर विभागात डेप्युटी कमिशनर पदावर कार्यरत असलेल्या नागपूरच्या रेखाताई चोंडेकर. गेल्या तेरा वर्षांपासून पहाटे साडेतीन वाजता उठणाऱ्या, सायकलवरून फिरणाऱ्या क्लास वन अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. आजवर स्वत:च्या खात्याअंतर्गत अनेक धाडसी मोहिमा त्यांनी राबविल्या म्हणूनच एकाच महिन्यात तीन वेळा त्यांची बदली झालेली आहे, यावरून त्यांच्या कामाची पद्धत व कर्तव्यदक्षता लक्षात येते.
आनंदवनात शिबिराचं आयोजन केलं असल्याने आनंदवनाला भेट ही ठरलेली होतीच. तेव्हा साधनाताईंनाही भेटता आलं. ‘प्रत्येकाच्या आयुष्यात एक क्षण असा येतो, तो क्षण जो पकडतो तो असामान्य ठरतो’ हा एका वाक्यात दिलेला मोलाचा सल्ला विचार करायला लावणारा होता. आजवर फक्त पुस्तकातून वाचलेलं व ऐकलेलं होतं पण प्रत्यक्ष आनंदवनात येण्याची ही पहिलीच वेळ, असे अनेकजण होते. समाजाने वाळीत टाकलेल्या परंतु इच्छाशक्ती, प्रचंड मेहनत आणि स्वाभिमानावर उभ्या केलेल्या आगळ्या-वेगळ्या विश्वाचा कारभार थक्क करणारा आहे. तेथील प्लास्टिक पुनर्वापर युनिट, हस्तकला, हातमाग, सुतारकाम विभाग, गाडय़ा दुरुस्तीचं गॅरेज, युवाग्राम, गोशाळा, रोपवाटिका, संधी निकेतन या सर्वच विभागांत काम करणारे लोक अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने ही कामे चोखपणे करत असतात. फक्त शैक्षणिक पदवीच्या जोरावर सर्व काही मिळवता येत नाही याचं हे उत्तम उदाहरण. शिबिरातील सर्व सहभागींसाठी ही अतिशय महत्त्वाची शिकवण होती. त्यात आणखीन भर म्हणून सर्वासाठी खास आयोजित केलेला स्वरानंदवन हा आनंदवनातील कलाकारांचा ऑर्केस्ट्रा. आपल्या अपंगत्वावर मात करून सामान्य माणसालाही लाजवेल असा पर्फॉर्मन्स देणाऱ्या व आजवर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि गोवा येथे आठशेहून अधिक प्रयोग केलेल्या या सर्व कलाकरांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
बाबा आमटेंनी काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेचं हे पंचवीसावं र्वष असल्याने या यात्रेत त्या वेळी सहभागी झालेल्या सर्वाना एकत्र येण्यासाठी आव्हान करण्यात आलं आहे. छोटू वरणगावकर, दगडू लोमटे, चंद्रकांत रागीट, संजय सोनटक्के, भूपेंद्र मुजुमदार हे त्यातलेच काही कार्तकर्ते या शिबिराच्या निमित्ताने येथे एकत्र आले होते. तसेच साताऱ्याचे डेंटिस्ट डॉ. अविनाश पोळ, अशोक बेलखोडे, प्रकाश ढोबळे हेही सहभागींशी संवाद साधायला व मदतीस आवर्जून उपस्थित होते.
शेवटच्या सत्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांतील सहभागींचे गट करून आपल्याला आपल्या जिल्ह्यात एकत्र येऊन समविचारी तरुण-तरुणींना एकत्र घेऊन काय काय कामे करता येतील यावर चर्चा झाली. आजवर सेवांकुरच्या शिबिरात सहभागी झालेल्या तरुणांना ई-मेल आणि एसएमएसद्वारे जोडण्यात आलं असल्याने ही चर्चा फक्त तेवढय़ापुरतीच मर्यादित न राहता यातून काहीतरी साध्य होईल असा सर्वाचा प्रयत्न राहणार आहे. तसेच शिवम्, स्नेहालय, सर्च, सोमनाथ या शिबिरांमार्फत पुढे येणाऱ्या तरुणांचा सहभाग हा फक्त तेवढय़ापुरताच मर्यादित न ठेवता, त्यातील उत्सुक तरुणांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रयोगांवर काम करण्यासाठी वर्षांतून कमीतकमी दोन आठवडे आपला वेळ द्यावा ही संकल्पना पुढे आली व त्याला अनेकांनी आपली पसंतीही दर्शविली आहे. तीन दिवसांच्या या शिबिरात वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या लोकांना जवळून समजून घेता आलंच पण त्यांच्याशी साधलेल्या संवादातून स्वत:ला काय करायचं हे प्रश्न थोडय़ाफार प्रमाणात का होईना सुटायला मदत झाली असं मत अनेक सहभागींनी आपले अनुभव सांगताना व्यक्त केलं.

Tuesday, September 7, 2010

iv#\#lasss|||ko`ta ze.Da 6e} ha4I|||

smajat sg;IkDec Anago.dI karwar calla Astana nVya ip!Ila nemkI va3 sapDt naihye| mla smajasa#I kaihtrI krayc.y, p` A@yaRhUn Ai2k t+`a.kDe nemk. kay krayc.y ya p/Xnac. ]%r nahIye| AaplI l#\# pgaracI nokrI soDUn smajkayaR.t vahUn 6e`a-ya.cI s.Qya Aata b-yapEkI va!lI AslI trI ]tarvyat he smajasa#I kaihtrI krayla paihje he suc`. 4oD. VyavharIk va3t.| kar` hLlI p/sarma@ym. Tya.Cya navaca Ai2k ]do ]do krtana idstat| mg Jya.nI Svt:la ya kayaRt t+`vyatc zokUn idl.y Tya.Cyavr ha ANyay nahI ka? Tya.Cya kamacI dql ^yayla ca;Is te pNnas v8aR.ca kalav2I java lagto, As. ka?
wart ha lokxahI p/2an dex Aahe| g/amp.cayt, raJy Aai` dexpat;Ivr dr pac v8aR.nI ho`a-ya invD`uka.m@ye Aapla p/itin2I invDUn de~yaca hKk 63nene p/Tyek wartIy nagrIkala idla Aahe| Aapla p/itin2I AapLya smSya soDiv~yasa#I jIvac. ran krel ya 0kac Aaxevr geLya sa# v8aRt ra*3/Iy pat;Ivr p.2ra srkar. s%et AalI| dr pac v8aR.nI wartatLya svRc raJy Aai` S4aink pat;IvrIl lokseveCya s.2IcI gi`t. ma.DLyas ha AakDa ck/avUn 3akel| yam@ye Anek lokp/itnI2I.na puNha puNha s.2I im;alI| kala.trane in*#ne kayR kr`a-ya (kayRkTyaR.la soDUn) Tya VyKtICya ku3u.batIl sdSyalac jntecI seva kr~yace waGy lawle| ya Axa va3calIt Anek lokp/itnI2I.nI Aaple Aady ktRVy Mh`Un AapLya pu!Cya ip!ya.na kxacIcI kmtrta wasU nye Mh`Un mo#ya p/ma`avr 2ns.cy k+n #evla Aahe| pr.tU qedacI bab hI kI Jya.nI Tya.Cyavr Aapla v AapLya smajaca ]@dar kr~yasa#I ivXvas 3akla to mtdar raja AajhI halaqItc idvs ka!t Aahe|
hLlI Aap` Vyvsayaca ]Lleq krtana Aiwmanane Da>K3r, [.ijinAr, AaikR3eK3 Ase krto p` xetk-yaca ]Lleq krtana samaNy xetkrI Asa ka krto? Ha p/Xn ko`I ivcarLyace 0ekle nahI| magIl dha v8aRt s.pU`R dexat xetk-ya.Cya AaTmhTya.c. p/ma` va!l. Aahe| xetkrI As`. ha Aiwmanaca wag raihla nsUn, xetIca par.parIk Vyvsay soDUn nvI ip!I yakDe ]6Dp`e ka`a Do;a krIt Aahe| xetIp/2an dexat xetk-y.acIc AxI dynIy AvS4a Astana [tr jntecI kay bat kr`ar? smaj su2ar`a kraycI Asel ik.va dexaca ivkas krayca Asel tr ku#e jav. Asa p/Xn ivcarla Asta, samaijk s.S4a ha 0kc pyaRy ]rla Aahe ka? (TyababthI hLlI x.kac yete) lokxahI AsleLya dexat rajkar` ha pyaRy ka g/ahy 2rla jat nahI? ”Politics is not my cup of tea” As. Mh`Un AajcI t=` ip!I TyapasUn dUr p;~yaca p/yTn krte| wartala Svat.-y im;aLyabrobrc ra*3Iy ka>g/es bad n krta Tyace rajkIy p9at =pa.tr zale Aai` teVhapasUn geLya sa# v8aR.t jv;pas Aa#xehUn Ai2k rajkIy p9a.cI no.d zalelI Aahe| Tyatle A@yaRhUn Ai2k fKt kagdavrc raihle, kahI S4aink pat;Ivr invD`uka l!Un yx n im;aLyane 4.D pDle tr kahI A.tgRt rajkar`amu;e lyala gele| Aata je kahI hataCya bo3avr moj~ya[tke p9 ]rle Aahet Tyaca lgam ha mU#wr loka.Cya hatat Aahe| As. Astana rajkIy ivcarsr`I ha mud\dac ye4e rd\dbadl zala Aahe| far dUr n jata fKt mhara*3aCyac rajkar`aca ivcar kela tr mra#I wa8a ha rajkIy mud\da zala Aahe| t;m;Ine Tyavr ko`Ic kam krtana, boltana idst nahI fKt AapLya Sva4aRpo3I pe3leLya inqa-ya.vr po;ya wajUn 6e~yace kam calle Aahe| Tyac paXvRwUmIvr nukt.c kahI je*# nagrIka.nI 0kac mud\dyala 2=n rajkar` kr`a-ya don mo#ya p9a.Cya imlnaca 6a3 6atla hota p` tohI rajkIy [C7axKtICya Awavane purepur fsla| svRc rajkIy p9a.t hec ic5 Aahe| [4e muQy mud\da ha Aahe kI jr p9atIl kayRkTyaR.m@yec hI wavna Asel tr je nVyane ih gu!I ]war~yaca p/yTn krIt Aahet Tya.c kay? rajkIy p9a.Cya yu4 iv.gsu@da fKt bDya neTya.Cya faydyasa#I t=`a.ca vapr k+n 6etat| Aai` mg s.63nec. kayR krt pu!e Aalela, samaijk p/Xna.cI yoGy ja` Aslela, ]%m net
mud\da p3t Asla trI magR p3t nahI, ivcar p3t Asle tr Tyavr kayRvahI nahI, kayRvahI hot Asel tr s.2I nahI he Aai` Ase Anek p/Xn smor ]we #akle Aahet| 6ra`exahIla ixVya 6al`are dexatIl svRc p9 Svt:vr ve; AalI kI puNha toc ik%a igrvt AsLyace idste| Aayu*ywr Jya.nI VyKtIpujela ivro2 kela v tse Aacr` kele Tya.ce put;e ]wa+n Tya.Cya xejarI Svt:ce put;e ]war~yace ik;sva`e p/kar k*3krI loka.Cya pExaca vapr k=n kele jat Aahet| m>DmcI AapLyavr k<*3I kaym AsavI Mh`Un jnteca ivro2 zuga=n, ku`acIhI pvaR n ba;gta 0kac 6ra~yatLya loka.Cya navacI lebl. sg;IkDe lavlI jat Aahet| ivkasac. rajkar` n krta AjunhI 2maRCya rajkar`at kahI p9a.na ram va3toy| wa.DvlIxahIla ivro2 kr`are v Svt:cI rajkIy ivcarsr`I jp`are p9 nVya ip!Ila AapLyakDe qec~yat pu`Rt: AyxSvI #rle Aahet Aai` Mh`Unc As.. Astana nemka ko`ta ze.Da ha4I ^yayca ha y9p/Xn ksa Aai` k2I su3`ar?
mu;at t=`a.nI ya 9e5athI Svt:la zokUn de}n kam kele paihje| AaplI AavD v ivcar pKka k+n pu`R ve; yat ]trLyas piriS4tI bdl~yas ve; lag`ar nahI| AapLyala nKkI ko`Tya iv8yat =cI Aahe yaca nI3 ivcar k+n Aai` g<*3Ikon bdlel| nukTyac p/is@d zaleLya 0ka Ahvalanusar Ase indxRnas Aale Aahe kI wartat dr carxe ma`sa.mage 0k samaijk s.S4a kam krte| hI s.Qya to.Dat bo3ee 6alayla lav`arI Aahe| Aata yam@ye fKt rajkar~ya.na do8 de}n ks. calel? yacac A4R Aap` svRc ku#etrI cukt Aahot| ya svR samaijk s.S4a.nI ha l!a ne3ane l!Lyas ivksnxIl v+n ivkist ra*3/ AxI wartacI Ao;q Vhayla iktIsa ve; lagel? drv8IR vegveg;ya s.S4a t=`a.ce mo#mo#ale me;ave 6etat, yatIl A@yaRhUn Ai2k t=` he s.2ICya xo2at it4e Aalele Astat| p` dudEvacI go*3 Mh`je Tya.cI AavD l9at 6e}n, Ty.ana yoGy idxa de}n, Tya.CyakDe AsleLya )anaca Aai` }jeRca smaj p/bo2nasa#I, su2ar`esa#I ksa vapr kela ja{l ha ivcar ma5 he me;ave s.pLyavr tsac mage pDto| to Vhayla hva Aai` t=`a.nIhI Tyaca pa#purava krayla hva, tse zaLyas  nemka ko`ta ze.Da ha4I ^yayca ha p/Xnc pD`ar nahI|  

Thursday, September 2, 2010

जल्लोष आणि थरार

बोरिवली

मुंबई जिल्हा काँग्रेस आणि खासदार संजय निरुपम यांच्यातर्फे बोरिवली येथील कोरा केंद्र मैदानात तब्बल ११ लाखांची दहीहंडी बांधण्यात आली होती. सकाळी दहा वाजल्यापासून हजारो प्रेक्षकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. दुपारी बारा वाजता संजय निरुपम यांच्या उपस्थितीत कोळसा खाणकाममंत्री प्रकाश जयस्वाल यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर तासाभराच्या आतच जवळपास दहा ते बारा पथकांनी सहा-सात थरांचे मानवी मनोरे उभारून उपस्थितांची मने जिंकली. आयोजकांतर्फे सहा थर लावणाऱ्यांना दीड हजार व सात थर लावणाऱ्यांना दोन हजारांचे रोख पारितोषिक व चषक देण्यात आले. खबरदारी म्हणून कुणाला इजा झाल्यास प्रथमोपचारासाठी संपूर्ण दिवस तीन डॉक्टरांच्या साथीने एक रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आली आहे. नशीब आजमावयाला विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव येथून दहीहांडी पथकांनी हजेरी लावली होती. उंचच उंच मानवी मनोरे रचताना जोडीला संगीताची साथ देण्यासाठी खास मुंबईचा फेमस डीजे अख्तर याला बोलाविण्यात आले होते. दीड हजारांहून अधिक गाणी वाजविणार असल्याचे त्याने सांगितले. त्यामध्ये मराठी-हिंदी चित्रपट संगीतापासून भांगडा, कोळीगीते आणि जन्माष्टमीच्या विशेष गाण्यांचा समावेश असणार होता. जोगेश्वरी येथील अष्टविनायक मित्रमंडळाच्या तीन वर्षांच्या गणेश रोकडे या चिमुकल्याने सातव्या थरावरून उपस्थितांना सलामी दिली. त्याबाबत त्याची प्रतिक्रिया विचारली असता तो म्हणाला, की मला वर चढायला अजिबात भीती वाटत नाही व ग्रुपमधील सर्व दादा माझी नीट काळजी घेतात. मालाड येथील बालगोपाल मित्रमंडळाचे राजेश धमणे म्हणाले, की आमची मुले ही सात थरांहून मोठय़ा हंडय़ाच फोडतात आणि या वर्षी कमीत कमी अशा दहा हंडय़ा फोडायचा आमचा विचार आहे.

Pots of Money or Curd?




Gokulasthami is one of the major festivals celebrated in Maharashtra and in recent times, politicians (who are widely seen as taking mileage out of the festival) have been competing with each other to attract larger crowds. “Big money tends to boost the egos of the party cadre. It has now become a prestige issue for politicians. “Politicians also cash in on media coverage given to rich mandals”. This festival is popular among the youth, who are the backbone of a political party, and this festival acts as the best platform to attract them. Politicians of all hues in Maharashtra are vying with each other to announce huge prize money for breaking the `Dahi Handis' (curd pots tied at a height to be broken by competing youngsters) here on the occasion of Gokulashtami, one of the most popular festivals.
Those organising the dahi handi festival in the city do not seem to have been affected by the global economic slowdown. The Gokulasthami is the biggest festival this year because many mandals have doubled the prize money. For politicians, the festival is the best opportunity to display their clout, which they do through the Dahi Handi mandals they run.
This year NCP MLA Jitendra Avhad, MNS legislator Ram Kadam, Minister and NCP leader Sachin Ahir, Shiv Sena legislator Pratap Sarnaik, Minority welfare minister Naseem Khan, Congress MP Sanjay Nirupam, NCP leader Pratap Surve were in top list to organise Dahi Handi competitions, offering generous amounts of prize money to the govindas.
Govinda mandals need to form nine or ten-tier pyramids to break most of the pots and walk away with the prizes. Apart from the big ones there are hundreds of other smaller `Dahi Handis' which are organised across the metropolis.
A year's hiatus due to the outbreak of swine flu last year seems to have added vigour to the Dahi Handi festival this year. With the stakes getting higher, the levels of pyramids are inching further upwards and the political fanfare is going overboard. Almost every political party has two-three leaders organising Dahi Handi competitions, offering generous amounts of prize money to the govindas.
This year Shiv Sena leader Anand Dighe's nearly 80-year-old handi at Tembi Naka has a golden rim worth Rs 3 lakh. On the other hand, Awhad's NGO Sangharsh has three gold-plated handis up for grabs.
Politicians have also roped in film stars to add to the glamour quotient. While Awhad has roped in Akshay Kumar, Sarnaik has invited Prachi Desai and Aftab Shivdasani to break the handis.
Organisers are also ensuring the safety of govindas by keeping ambulances on standby. Some of them are also providing free insurance policies to govindas and top of that Shiv Sena leader has promised to provide employment opportunities to the govindas.
Govinda mandals, however, are not impressed with the increase in prize money, because they hardly get a fraction of the prize money. Most of the mandal’s say organisers announce grand prizes for eight, nine and ten-tier human pyramids, which are impossible to achieve for most Govindas [those who form human pyramids to reach the pot]. “Many mandals tend to subtract the expenses of the band or music system and refreshments and they hardly get half. Also there are many incidences where cheques often bounce and after the festival organisers make them run around for the prize money.