Tuesday, September 28, 2010

म्हणजे काय?

माया,
लळा लागणं,
आनंद,
प्रेम,
म्हणजे काय?
नेमकं, मोजक्या शब्दात सांगणं,
कठीण आहे!


दुःख,
लोभ,
मत्सर,
राग,
म्हणजे काय?
नेमकं, मोजक्या शब्दात सांगणं,
कठीण आहे!


मला काहीतरी करायचंय,
स्वतःसाठी,
आपल्या माणसांसाठी,
देशासाठी,
म्हणजे काय?
नेमकं, मोजक्या शब्दात सांगणं,
कठीण आहे!

मी स्वतःला बदलेन,
समाजाला बदलेन,
देशाला बदलेन,
किंवा जग बदलून टाकीन,
म्हणजे काय?
नेमकं, मोजक्या शब्दात सांगणं,
कठीण आहे!


पण,
नेमकं, मोजक्या शब्दात सांगणं,
कठीण आहे!
म्हणजे काय?